ओस्लो : नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजाईने आपल्याला पाकिस्तानचा पंतप्रधान होण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं आहे.
‘मला राजकारणात करिअर करण्याची इच्छा आहे, मला पाकिस्तानचं पंतप्रधानपद भूषवण्याची इच्छा आहे, अशा भावना पाकिस्तानमधील नोबेल पारितोषिक विजेत्या मलाला युसाफझाय हिने व्यक्त केली आहे.
यावेळी बोलताना मलाला पुढे म्हणाली की, "आम्ही केवळ येथे पुरस्कार स्वीकारून घरी जाण्यासाठी आलेलो नाहीत, तर जगातील बालकांनी उभं राहण्याची गरज आहे, हक्कांसाठी आवाज उठविण्याची गरज आहे, हे सांगण्यासाठी आलो आहोत.
मला माझ्या देशासाठी काम करायचे असून माझ्या देशाला विकसित करायचे आहे. तसेच देशातील प्रत्येक बालक शिक्षण घेताना पहायचा आहे‘ असेही ती यावेळी म्हणाली. पाकिस्तान किंवा भारताचे पंतप्रधान यासोहळ्यास या सोहळ्यास उपस्थित न राहिल्याबद्दल तिने यावेळी खंत व्यक्त केली.
मलाला युसाफझाय हिच्यासह भारतातील बालहक्कांसाठी काम करणारे कैलाश सत्यार्थी यांनाही नोबेल पारितोषिक बहाल जाहीर करण्यात आला आहे. सत्यार्थी यांनी बचपन बचाओ आंदोलनाच्या माध्यमातून 80 हजार बालकांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.