'मोदींसाठी जगाचे पंतप्रधान पद तयार करा'

पंतप्रधान यांच्या परदेश दौऱ्यावरून लालू यादव यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 'मोदी हे अनिवासी भारतीय बनले आहेत' अशी टीका लालूंनी केली आहे. पंतप्रधान मोदींसाठी 'जगाचे पंतप्रधान' असे पद तयार करावे असं देखील लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. 

Updated: Jun 14, 2016, 01:19 PM IST
'मोदींसाठी जगाचे पंतप्रधान पद तयार करा' title=

नवी दिल्ली : पंतप्रधान यांच्या परदेश दौऱ्यावरून लालू यादव यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 'मोदी हे अनिवासी भारतीय बनले आहेत' अशी टीका लालूंनी केली आहे. पंतप्रधान मोदींसाठी 'जगाचे पंतप्रधान' असे पद तयार करावे असं देखील लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. 

सरकारच्या गेल्या दोन वर्षांच्या काळात मोदींनी अनेक देशांचे दौरे केले. त्यावरुन विरोधकांनी त्यांना धारेवर धरले. मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत, पण सर्वाधिक काळ ते देशाबाहेरच असतात. मोदींसाठी जगाचे पंतप्रधान असे पद तयार करावे, असं मी जगभरातील नेत्यांना अपील करतो असं त्यांनी म्हटलं आहे.