पोटनिवडणुकांत भाजपला झटका; काँग्रेस, सपाची मुसंडी

 देशातील लोकसभा आणि विधानसभेतील पोटनिवडणुकांच्या निकालात भाजपला झटका बसलाय. तर समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला फायदा झालाय. त्यामुळं राष्ट्रवादीनं भाजपवर टीका केलीय. 

Updated: Sep 16, 2014, 07:21 PM IST
पोटनिवडणुकांत भाजपला झटका; काँग्रेस, सपाची मुसंडी title=

नवी दिल्ली :  देशातील लोकसभा आणि विधानसभेतील पोटनिवडणुकांच्या निकालात भाजपला झटका बसलाय. तर समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला फायदा झालाय. त्यामुळं राष्ट्रवादीनं भाजपवर टीका केलीय. 

या पोटनिव़डणुकांच्या निकालाचा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही असा  विश्वास राज्यातील भाजपच्या नेत्यांना वाटतोय.  उत्तरप्रदेश सपाकडून भाजपचा सफाया झाला. तर राजस्थानमध्येही काँग्रेसकडून पानिपत, मोदींच्या गुजरातमध्ये 3 जागा हिसकावल्या.

राज्यात या निकालाचा परिणाम होणार नाही, असं भाजप नेत्यांना विश्वास वाटत आहे. देशात मोदी लाट ओसरली का असा प्रश्न निर्माण झालाय. 9 राज्यांमधल्या 33 विधानसभा आणि 3 लोकसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपची पीछेहाट झाल्याचं चित्र दिसले. 

उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये भाजपला फटका बसलाय. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीनं जोरदार मुसंडी मारलीये. तर राजस्थानमध्ये भाजपचं पुरतं पानिपत झालंय. 4 पैकी केवळ 1 जागा भाजपला राखता आलीये. गुजरातमध्येही भाजपकडून काँग्रेसनं २ जागा हिसकावल्या आहेत. 

मतमोजणीतून तीन महत्त्वाच्या राज्यात भाजपचं नुकसान झालेय. बरोबर 4 महिन्यांपूर्वी लागलेल्या निकालांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या तीन्ही राज्यांवर भाजपनं अक्षरशः झाडू फिरवला होता. गुजरात आणि राजस्थानात सर्व जागा भाजपनं पटकावल्या, तर उत्तर प्रदेशातल्या अभूतपूर्व यशामुळे मोदींचा पंतप्रधान होण्याचा मार्ग अधिक प्रशस्त केला होता. मात्र अवघ्या 4 महिन्यांत भाजपला या तीन्ही राज्यांमध्ये धक्का बसलाय.

उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पार्टीनं पुन्हा एकदा मुसंडी मारलीये. तर राजस्थानमध्ये चार पैकी 3 जागा भाजपला गमवाव्या लागल्यात. गुजरातची स्थिती इतकी वाईट नसली, तरी भाजपची लोकप्रियता कमी झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. आता पुढल्या महिन्यात महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभेचं मतदान होतंय. अशा वेळी पोटनिवडणुकीचा निकाल हा भाजप आणि मित्रपक्षांसाठी वेक अप कॉल आहे, असंच म्हणावं लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.