गोव्यात महायुती, भाजपचेच मित्र विरोधात एकवटले

गोव्यात निवडणुकांसाठी युती जाहीर झाली आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक, सुभाष वेलिंगकरांचा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेनं युती जाहीर केली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना एकत्र आले आहेत. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष ३०, गोवा सुरक्षा मंच ६ आणि शिवसेना ४ जागा लढवणार आहे.

Updated: Jan 11, 2017, 09:52 AM IST
गोव्यात महायुती, भाजपचेच मित्र विरोधात एकवटले title=

पणजी : गोव्यात निवडणुकांसाठी युती जाहीर झाली आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक, सुभाष वेलिंगकरांचा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेनं युती जाहीर केली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना एकत्र आले आहेत. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष ३०, गोवा सुरक्षा मंच ६ आणि शिवसेना ४ जागा लढवणार आहे.

नुकताच सर्वोच्च न्यायालयानं जात, धर्म, भाषा आणि प्रादेशिक अस्मिता या  निकषांवर आता मते मागता येणार नाही असा आदेश दिला आहे. त्यामुळं गोव्यात वेलिंगकरांच्या गोवा सुरक्षा मंचासमोरच्या अडचणी वाढतली असं बोललं जात होतं मात्र आता महाराष्ट्रवादी गोमांतक, शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंचंची ताकद एकत्र आली आहे. गोव्यातल्या इतर महत्त्वाच्या मुद्दांवर निवडणुका लढवू आणि भाजपला मात देऊ असा विश्वासही युतीकडून व्यक्त केला जातो आहे.