'आता सगळ्यांना वाटतेय मी ऑफिसमध्ये S*x करतो!' App वरुन कंडोम ऑर्डर केले अन्...

Order Condom In Office: ज्या व्यक्तीबरोबर हा सारा प्रकार घडला त्यानेच याबद्दलची माहिती सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे. त्याने फोटोसहीत याबद्दलचा सविस्तर घटनाक्रम आपल्या पोस्टमध्ये सांगितला आहे. नक्की हा प्रकार काय आहे पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 22, 2024, 04:19 PM IST
'आता सगळ्यांना वाटतेय मी ऑफिसमध्ये S*x करतो!' App वरुन कंडोम ऑर्डर केले अन्... title=
या व्यक्तीनेच सांगितला घटनाक्रम (फोटो सोशल मीडियावरुन साभार, उजवीकडील फोटो प्रातिनिधिक आहे)

Order Condom In Office: पूर्वी सॅनिटरी पॅड्स आणि कंडोमसारख्या गोष्टी घेणं हे आव्हानात्मक समजलं जायचं. आपण असं काही घेतोय हे लोकांना लक्षात येऊ नये असा सर्वांचा प्रयत्न असतो. सध्याचा जमाना हा ऑनलाइन आणि अॅप्लिकेशनवरुन केल्या जाणाऱ्या शॉपिंगचा आहे. हल्ली वाटेल त्या गोष्टी ऑनलाइन मागवता येतात. या गोष्टी अगदी घरापासून ऑफिसपर्यंत आणि एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या घरीही थेट मागवता येतात. मात्र असं सगळं असताना आणि हल्ली खासगी गोष्टी घेण्यासंदर्भात फार गुप्तता पाळायची गरज नसतानाही काही गोष्टी अशा आहेत की ज्या पाहिल्यावरच अनेकांच्या भुवया उगाच उंचवतात. आपण काही खासगी गोष्टी कुठून, कशा आणि कधी घेतो हे जाहीरपणे सांगण्याची गरज नसते. कारण त्या फारच खासगी वापराच्या गोष्टी असतात. पण एका माणसाचा हा खासगीपणा नुकताच एका कंपनीने पणाला लावल्याचा मजेदार प्रकार घडला.

अपेक्षा अशी होती की...

झालं असं की, या वय्क्तीने स्वीगी इन्स्टामार्टवरुन कंडोमचं पाकीट मागवलं आणि ते ही चक्क आपल्या ऑफिसमध्ये. याबद्दलचा खुलासा त्याने स्वत: आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केला आहे. आपण ऑर्डर केलेली एवढी खासगी गोष्ट एखाद्या पेपर बॅगमध्ये डिलीव्हर होईल अशी या व्यक्तीची अपेक्षा होती. कंडोमसारखी गोष्ट काळजीपूर्वक डिलेव्हर केली जाईल अशी या व्यक्तीची अपेक्षा होता. कारण सामान्यपणे अशा गोष्टी ऑफिसमध्ये मागवल्यावर त्या ऑफिसच्या रिसेप्शनवर किंवा फ्रंट डेस्कवर डिलेव्हर केल्या जातात. 

भलतीच गोष्ट घडली

मात्र झालं भलतंच काहीतरी. या व्यक्तीने मागवलेलं कंडोमचं पाकीट कंपनीने अशा काही पद्धतीने डिलेव्हर केलं की त्याने काय मागवलं आहे याची चर्चा संपूर्ण ऑफिसमध्ये झाले. हा सारा प्रकार नक्की घडला कुठे याचा तपशील देण्यात आलेला नाही. मात्र सोशल मीडियावर या डिलेव्हर केलेल्या कंडोमच्या पाकीटाच्या फोटोसहीत पोस्ट करण्यात आला आहे. 

पोस्टमध्ये काय म्हटलंय?

मनन सिंग नावाच्या व्यक्तीने आपल्या रेडीइट अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये याबद्दल लिहिलं आहे. "स्वीगी इन्स्टामार्टने मला बरबाद केलं," या मथळ्याखाली त्याने पोस्ट लिहिली आहे. "कंडोम विकत घेणं ही काही मोठी गोष्ट राहिलेली नाही. मी सामान्यपणे ते ब्लिंकइटवरुन मागवतो कारण ते असल्या गोष्टी कागदाच्या पिशवीत देतात. मात्र मी यावेळेस ऑफिसमध्ये असताना स्वीगी इन्स्टामार्टवरुन कंडोम मागवले. मला असं वाटलं की ते सुद्धा कागदाच्या बॅगमध्ये कंडोम पाठवतील. मी बावळटासारखं त्यांना पार्सल ऑफिसच्या रिसेप्शनवर सोडण्यास सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे पारदर्शक पिशवीमध्ये कंडोम डिलेव्हर केलं गेलं आणि ते सुद्धा सिसेप्शनसिस्टसमोर. आता माझ्या संपूर्ण ऑफिसला असं वाटतंय की मी ऑफिसमध्ये सेक्स करतो," असं या व्यक्तीने म्हटलं आहे.

अनेकांनी यावरुन या मुलाला ट्रोल केलं आहे. अनेकांनी या मुलाला आता याचा फार विचार केला तर अजून अवघडल्यासारखं होईलं असं म्हणत फार विचार न करण्याचा सल्ला दिला आहे.