महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळांसोबत कुटुंबीयही अडचणीत

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी 'एसीबी'नं ही कारवाई केलीय.

Updated: Jun 11, 2015, 11:05 PM IST
महाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळांसोबत कुटुंबीयही अडचणीत title=

नवी दिल्ली : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी 'एसीबी'नं ही कारवाई केलीय.

यामध्ये, छगन भुजबळ, पंकज आणि समीर भुजबळ यांच्यासह १७ जणांविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. त्यामध्ये महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करणारे कृष्णा चमणकर, प्रविणा चमणकर, प्रणिता चमणकर आणि प्रसन्न चमणकर अशा चौघांचाही समावेश आहे. 

याप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. हायकोर्टानं १८ डिसेंबर २०१४ रोजी याबाबत विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात करण्यात आलेल्या उघड चौकशीनुसार अॅन्टी करप्शन ब्युरोनं ही धडक कारवाई केलीय.

इंडिया बुल्सला जमीन दिल्याप्रकरणी भुजबळांवर याआधीच गुन्हा दाखल झालाय. त्यानंतर आता हा दुसरा गुन्हा नोंद झाल्यानं भुजबळ चांगलेच अडचणीत आलेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.