महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद : शिवसेनेकडून लोकसभेत मुद्दा उपस्थित

महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद सुटण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. यासाठी शिवसेनेने लोकसभेत आवाज उठवला. ज्या प्रदेशावर वाद सुरु आहे, तो प्रदेश केंद्रशासित करण्यात यावा, अशी शिवसेनेने मागणी केलेय.

Updated: Aug 2, 2016, 04:17 PM IST
महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद : शिवसेनेकडून लोकसभेत मुद्दा उपस्थित title=
छाया : लोकसभा

नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद सुटण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. यासाठी शिवसेनेने लोकसभेत आवाज उठवला. ज्या प्रदेशावर वाद सुरु आहे, तो प्रदेश केंद्रशासित करण्यात यावा, अशी शिवसेनेने मागणी केलेय.

महाराष्ट्र - कर्नाटकचा सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी, लोकसभेत करण्यात आली आहे. शिवसेनेकडून लोकसभेत ही मागणी केली गेली. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी ही मागणी केली. अनेक वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न रेंगाळलेला आहे.