उठा उठा दिवाळी आली, 'मॅगी' आणायची वेळ झाली!

दिवाळीच्या मुहर्तावर मॅगी बाजारात दाखल झालीय. आजपासून मॅगीची उत्पादनं बाजारात उपलब्ध होणार असल्याची घोषणा नेस्लेनं केलीय. त्यामुळं दिवाळीच्या मुहूर्तावर मॅगी प्रेमींसाठी ही आनंदाचीच बातमी आहे. 

Updated: Nov 9, 2015, 04:47 PM IST
उठा उठा दिवाळी आली, 'मॅगी' आणायची वेळ झाली! title=

नवी दिल्ली: दिवाळीच्या मुहर्तावर मॅगी बाजारात दाखल झालीय. आजपासून मॅगीची उत्पादनं बाजारात उपलब्ध होणार असल्याची घोषणा नेस्लेनं केलीय. त्यामुळं दिवाळीच्या मुहूर्तावर मॅगी प्रेमींसाठी ही आनंदाचीच बातमी आहे. 

गेल्या पाच महिन्यांपासून बंदी असलेली 'मॅगी' आज परतणार आहे. भारतातच नव्हे तर अमेरिका, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून मॅगीची विक्री सुरु होणार आहे. नेस्ले इंडिया या अधिकृत ट्विटर हँण्डलवरुन याबाबत ट्विट करून माहिती देण्यात आलीय.

आणखी वाचा - दिवाळीत फराळासोबत मॅगीची चव घेता येणार

‘तुमची आवडती मॅगी परत आलीय’ #WelcomeBackMAGGI या हॅशटॅगसह हे नेस्लनं ट्विट मॅगीबद्दल ट्वीट केलं आहे. 

मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण जास्त असल्याचं आढळल्यानं देशात मॅगीवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर देशात आणि परदेशात जवळपास ३५०० ठिकाणी मॅगीची चाचणी करण्यात आली. या चाचण्यांनंतर मॅगी खाण्यास योग्य असल्याचं सांगण्यात आलंय.   

आणखी वाचा - मॅगीवर बंदीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार : बापट

दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं मॅगीवर बंदी कायम ठेवलीय. नेस्लेविरोधात राज्य सरकार आता सुप्रिम कोर्टात धाव घेणार आहे. त्यामुळं राज्यातील जनतेला मॅगी खाण्यासाठी आणखी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.