नवी दिल्ली : ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पुन्हा एकदा सब्सिडी आणि विना सब्सिडी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. गुरुवारी कंपन्यांनी सब्सिडी वाले सिलेंडरवर 2.07 रुपये आणि बिना सब्सिडी वाल्या सिलेंडरवर 54.50 रुपये वाढवल्याची घोषणा केली आहे. दिल्लीत आता सब्सिडी वाला सिलेंडर 430.64 रुपयांवरुन 432.71 रुपये झाला आहे. बिना सब्सिडी वाला सिलेंडर 529.50 रुपयांऐवजी आता 584 रुपयांना मिळणार आहे.
जुलैनंतर आतापर्यंत घरगुती वापरला जाणार 4.2 किलोग्रामचा सब्सिडी सिलेंडरच्या किंमती ७ वेळा वाढल्या आहेत. सरकारने सब्सिडी कमी करत प्रत्येक महिन्याला २ रुपये वाढवत आहेत. २८ ऑक्टोबरला डीलर कमीशनच्या रुपात दीड रुपये अधिक वाढवला होता. बिना सब्सिडीचा सिलेंडरचे दर देखील चौथ्यांदा वाढले आहेत. चार वेळा एकूण ११८ रुपये वाढले. १ नोव्हेंबरला ३७.५० रुपये वाढले होते.