www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
तरुणांनो, सावधान! लग्नाआधीच तुम्हाला काही पैसे ठेव म्हणून जमा करावं लागणार आहे... होय, तुम्हाला जर घरच्यांच्या विरोधात जाऊन तुमच्या प्रेयसीबरोबर लग्न करायचं असेल तर कमीत कमी ५० हजार रुपये तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे... हे ५० हजार रुपये बँकेत फिक्स्ड डिपॉझिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रेयसीसोबत लग्न करता येईल, तसा आदेशच उच्च न्यायालयानं दिलाय.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस महासंचालक (डीजीपी) देवराज नागर यांनी या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. संत कबीरनगरमधल्या महुली येथे राहणारी रेखा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयानं हे आदेश दिलेत. त्यामुळे, आता लव्ह मॅरेज करणाऱ्या युवकांना आपल्या प्रेयसीच्या सुरक्षित भविष्याची हमी लग्नाअगोदरच द्यावी लागणार आहे.
बऱ्याचदा, मुली आपल्या प्रेमासाठी आई-वडील आणि नातेवाईकांना सोडून जातात. त्यामुळे आपल्या कुटुंबालाच त्यांना पारखं व्हावं लागतं. मात्र, लग्न केल्यानंतर आपल्याच जोडीदाराकडून त्यांची अनेकदा फसवणूक होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या पुढच्या भविष्यत अनेक संकटांना समोरे जावं लागतं.
अशा मुलींना या धक्क्यातून सावरण्यासाठी आणि आपलं जीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी हे फिक्स्ड डिपॉझिटमधील पैसे मदतीचे ठरतील, या हेतून हे आदेश देण्यात आलेत. डीजीपींनी १३ डिसेंबरला पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेच.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.