अर्थव्यवस्थेच्या निकोप वाढीसाठी भाजपाचे उपाय

अर्थव्यवस्थेच्या निकोप वाढीसाठी भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने काय काय उपाय योजना केल्या, याचा पाढा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बजेटमध्ये वाचून दाखवला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 1, 2017, 04:36 PM IST
अर्थव्यवस्थेच्या निकोप वाढीसाठी भाजपाचे उपाय title=

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेच्या निकोप वाढीसाठी भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने काय काय उपाय योजना केल्या, याचा पाढा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बजेटमध्ये वाचून दाखवला. एकंदरीत या योजनांचा फायदा जनतेला किती झाला हा प्रश्न अजून अनुत्तरीत असताना, भाजपने या योजनानांचा पाढा वाचून दाखवला आहे.

• महागाईवर नियंत्रण मिळवण्यात यश
• शेतकरी आणि गरीबांसाठी योजना राबवल्या
• काळ्या पैशांविरोधात सरकारनं युद्ध छेडलं
• देशाच्या आर्थिक विकासाचा दर वाढला
• बेरोजगारी कमी करण्यासाठी योजना राबवल्या
• डाळींच्या उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित
• परदेशी गुंतवणूक वाढवण्यात सरकारला यश
• कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी अस्थिरता
• भारत जगातली सहाव्या नंबरची अर्थव्यवस्था
• मोठी निर्गुंतवणुक करणारा भारत सहावा देश
• 2016 मध्ये जगात मंदी, भारतात तेजी
• नोटबंदीमुळे बँकांच्या व्याजदरात कपात
• 2017 मध्ये भारताची विकासाची गती वाढणार
• भारताचा विकासदर 7.6 राहणार - वर्ल्ड बँक
• बजेटमध्ये ग्रामीण भागाला केंद्रस्थानी
• नोटबंदीचा परिणाम लवकरच संपुष्टात येईल
• बजेटमध्ये गरीब आणि शेतक-यांना प्राधान्य
• यंदाच्या बजेटमध्ये 3 महत्त्वाच्या सुधारणा
• निधीचा  पूर्ण वापर व्हावा यासाठी लवकर बजेट
• रेल्वे बजेट सर्वसाधारण बजेटमध्ये समाविष्ट