इमारत कोसळल्याने १२ मजुरांचा मृत्यू, १०० हून अधिक ढिगाऱ्याखाली

जाजमऊ भागामध्ये एक इमारत कोसळल्याने १२ मजुरांचा मृत्यू झाला आहे. अजूनही १०० हून अधिक लोकं याच्या खाली अडकल्याची माहिती मिळते आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचली आहे.

Updated: Feb 1, 2017, 04:18 PM IST
इमारत कोसळल्याने १२ मजुरांचा मृत्यू, १०० हून अधिक ढिगाऱ्याखाली title=

कानपूर : जाजमऊ भागामध्ये एक इमारत कोसळल्याने १२ मजुरांचा मृत्यू झाला आहे. अजूनही १०० हून अधिक लोकं याच्या खाली अडकल्याची माहिती मिळते आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचली आहे.

नव्या इमारतींचं काम सुरु असतांना ही घटना घडली. बचाव कार्यासाठी सेनेचे जवान देखील तेथील पोहोचले आहेत. बचाव कार्य सुरु झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने बचाव कार्य सुरु केलं आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या लोकांना वाचवण्याचं काम सुरु आहे.