नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा बँकांना दिलासा मिळण्याची शक्यता असून, यासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत नाबार्डने राज्यातल्या 31 जिल्हा बँकांमध्ये निरीक्षण पूर्ण करून एक अहवाल तयार केलाय. यात या बँकांमधल्या ठेवी, जमा झालेले पैसे, झालेले व्यवहार या सगळ्याची सखोल माहिती गोळा करण्यात आली. नाबार्डने हा अहवाल अर्थ मंत्रालयाला सादर केला आहे.
जिल्हा बँकांना रोकड देऊन खात्यात पैसे भरायला आणि काढायला परवानगी द्यावी, या दोन मागण्या राज्य सरकारने केल्या होत्या. या मागण्या आता नाबार्डच्या अहवालानंतर पूर्ण होण्याची शक्यता आहे.