केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू अडचणीत

या जलविद्युत प्रकल्पाला दगड पुरवण्याचे कंत्राट किरेन रिजीजू यांचे नातेवाईक गोगोई रिजीजू यांना देण्यात आले होते. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 14, 2016, 05:31 PM IST
केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू अडचणीत title=

नवी दिल्ली : केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन अडचणीत सापडलेत. अरुणाचल प्रदेशमधील कामेंग जलविद्युत प्रकल्पाला दगड पुरवण्याच्या कामात गैरव्यवहार आणि अनियमितता असल्याचे समोर आलंय.

या जलविद्युत प्रकल्पाला दगड पुरवण्याचे कंत्राट किरेन रिजीजू यांचे नातेवाईक गोगोई रिजीजू यांना देण्यात आले होते. 

कामेंग जलविद्युत प्रकल्प किरण रिजीजू यांच्या मतदारसंघात येतो.. रिजीजू यांनी भ्रष्टाचार करणा-याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केलीय. तर किरेन रिजीजू यांनी काँग्रेसचे हे आरोप फेटाळत जोरदार हल्लाबोल केला आहे.