भयंकर : बहिण-कुत्र्यांच्या मृत शरीराच्या अवशेषांसोबत त्यानं घालवले सहा महिने

घरात आग लागल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याच घटनेच्या चौकशी दरम्यान शहर पोलिसांना मात्र जबरदस्त धक्का बसला.  कारण, याच घरात मृत पावलेल्या व्यक्तीचा मुलगा मोठी बहिण आणि दोन पाळीव कुत्र्यांच्या मृत पावलेल्या, कुजलेल्या शरीरासोबत आढळला. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या सहा महिन्यांपासून हा व्यक्ती याच अवस्थेत या घरात राहत होता. 

Updated: Jun 12, 2015, 08:54 PM IST
भयंकर : बहिण-कुत्र्यांच्या मृत शरीराच्या अवशेषांसोबत त्यानं घालवले सहा महिने title=

कोलकाता : घरात आग लागल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याच घटनेच्या चौकशी दरम्यान शहर पोलिसांना मात्र जबरदस्त धक्का बसला.  कारण, याच घरात मृत पावलेल्या व्यक्तीचा मुलगा मोठी बहिण आणि दोन पाळीव कुत्र्यांच्या मृत पावलेल्या, कुजलेल्या शरीरासोबत आढळला. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या सहा महिन्यांपासून हा व्यक्ती याच अवस्थेत या घरात राहत होता. 

कोलकाता शहरातील रॉबिन्सन स्ट्रीटच्या तीन क्रमांकाच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. याच घटनेची चौकशी पोलीस करत होते. बुधवारी रात्री एका बाथरूममध्ये घराचा ७७ वर्षीय मालक अरविंदो डे यांचं जळालेल्या अवस्थेत शव आढळलं होतं. 

विशेष अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) पल्लव कांती घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याच्या घटनेनंतर गुरुवारी रात्र डे यांच्या फ्लॅटच्या बाहेर दोन पोलीस कॉन्स्टेबल तैनात केले. यानंतर, डे यांचा मलगा पार्थ डे (४५ वर्ष) यानं पोलिसांना पाहून विचित्र पद्धतीनं वागणं सुरू केलं. पहिल्यांदा वडिलांच्या मृत्यूचा धक्का बसल्यानं पार्थ असं करतोय, असं पोलिसांना वाटलं. पण, जेव्हा त्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली तेव्हा त्यानं आपल्या घरात आपली मोठ्या बहिणीचं मृत शरीर तसंच कुत्र्यांचीही उरलेले हाडं घरात असल्याचं सांगितलं.

यानंतर, पोलिसांनी घरात शोधाशोध केल्यानंतर त्यांना एका रुममधून पार्थच्या मोठ्या बहिणीचा - देवजानी (५०) हिचं आणि दोन पाळीव कुत्र्यांचं मृत शरीर सापडलं. तसंच, दुसऱ्या एका रुममधून कथित रुपात पार्थच्या पित्यानं लिहून ठेवलेली सुसाईड नोटही पोलिसांच्या हाती लागलीय.  आठ जून अशी तारीख लिहिलेल्या या सुसाईड नोटमध्ये पार्थच्या वडिलांनी आपल्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असं लिहिलंय. 

पार्थ डे याच्या म्हणण्यानुसार, देवजानी हिनं गेल्या वर्षी आपल्या दोन लाडक्या कुत्र्यांच्या मृत्यूनंतर खाणं-पिणं सोडून दिलं होतं. सहा महिन्यांपूर्वी तिचाही मृत्यू झाला. 

पोलिसांनी पार्थला मनोरुग्णालयात दाखल केलंय. घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही... तसंच कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. तीनही मृत शरीरांच्या अवशेषांना फॉरेन्सिक चौकशीसाठी धाडण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.