मंत्र्यांची अश्लिल ऑडिओ क्लिप उघड... दिला राजीनामा!

केरळचे परिवहन मंत्री ए. के. शशींद्रन यांच्यावर एका महिलेनं अश्लिल संभाषण करण्याचा आरोप केलाय. इतकंच नाही तर त्यांचा अश्लिल भाषेत बोलत असल्याची एक ऑडिओ क्लिपही समोर आलीय. 

Updated: Mar 27, 2017, 12:16 PM IST
मंत्र्यांची अश्लिल ऑडिओ क्लिप उघड... दिला राजीनामा! title=

कोचीन : केरळचे परिवहन मंत्री ए. के. शशींद्रन यांच्यावर एका महिलेनं अश्लिल संभाषण करण्याचा आरोप केलाय. इतकंच नाही तर त्यांचा अश्लिल भाषेत बोलत असल्याची एक ऑडिओ क्लिपही समोर आलीय. 

या प्रकरणानंतर नामुष्की ओढावलेल्या शशींद्रन यांना राजीनामा द्यावा लागलाय. आपल्यावरील आरोप निराधार असून केवळ नैतिकतेच्या दृष्टीकोनातून आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. 

मुख्यमंत्री आणि सरकारकडे त्यांनी आपल्यावरच्या आरोपांची चौकशी व्हावी, यासाठी मागणी केलीय. आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय.