तिरुवनंतपुरम: माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांना खाण्याची खूप आवड होती. ते शाकाहारी होते आणि साधं-सात्विक भोजन त्यांना आवडायचं. डॉ. कलाम जेव्हा केरळला जायचे तेव्हा तिरुवनंतपुरमच्या एका खास हॉटेलमध्येच जेवायचे.
1975 पासून 1982 पर्यंत जेव्हा डॉ. कलाम विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये काम करत होते. तेव्हा ते तिरुवनंतपुरमच्या परमेश्रवरन नायर यांच्या हॉटेलमध्ये नियमितपणे जेवायला जायचे. हॉटेलच्या संचालकांसाठी ते नेहमीचे ग्राहक होते. डॉ. कलाम लंच आणि जिनर दोन्ही परमेश्रवरन यांच्याच हॉटेलमध्ये करायचे.
82 वर्षीय नायर डॉ. कलाम यांच्याबद्दल आपली आठवण सांगतांना म्हणाले, एक ग्लास दूध आणि दोन अपाम्स ते घ्यायचे. हॉटेल मालकांच्या मते ते नेहमीच घाईत असायचे. बिल द्यायला विसरलो तर मला नक्की आठवण करून द्या, असं सांगायलाही डॉ. कलाम विसरायचे नाही.
डॉ. कलाम यांच्यासाठी हॉटेल मालकांच्या मनात विशेष आदर होता. कलामांच्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आता जेव्हा डॉ. कलामांनी जगाचा निरोप घेतलाय. तेव्हा परमेश्रवरन यांनी आपल्या हॉटेलमध्ये डॉ. कलाम यांच्या नावानं एक थाळी ठेवणार असल्याचं जाहीर केलंय. डॉ. कलामांना जे जेवण आवडायचं ते या थाळीत असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.