नवी दिल्ली: जेएनयू वादानंतर जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार चर्चेमध्ये आला. पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र कन्हैय्यावर चांगलेच भडकले आहेत.
अरविंद केजरीवाल आणि कन्हैय्या यांच्यात गुरुवारी बैठक होणार होती, पण कन्हैय्या या बैठकीला वेळेवर पोहोचला नाही. कन्हैय्यासाठी केजरीवालांना तब्बल एक तास वाट पाहावी लागली, अखेर नाराज होऊन केजरीवाल निघून गेले.
सीपीआयचे राष्ट्रीय सचिव डी.राजा ही या बैठकीसाठी थांबले होते. पण ट्रॅफिकमध्ये अडकल्यानं कन्हैय्या वेळेत पोहोचू शकला नाही, अशी प्रतिक्रिया डी. राजा यांनी दिली आहे.
कन्हैय्या आणि केजरीवाल यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली, तेव्हा हे दोघं शनिवारी भेटू शकतात असंही राजा म्हणाले आहेत. पण भविष्यात अशी कोणतीही बैठक ठरली नसल्याचं दिल्ली सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.