www.24taas.com, राळेगणसिद्धी
`इंडिया अगेन्सट करप्शन`चे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना आयएसीमधील उरलेली रक्कम देऊ केली होती. ही रक्कम २ कोटी रुपये इतकी आहे.
एका वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार काही महिन्यांपूर्वी केजरीवाल पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशनकडे ठेवलेल्या २ कोटी रुपयांचा चेक घेऊन राळेगणसिद्धीला गेले होते. तिथे केजरीवाल यांनी अण्णांना दोन कोटी रुपयांचा हा चेक स्वीकारण्याची विनंती केली.
अण्णांच्या अत्यंत जवळच्या सूत्रांकडून इंडियन एक्सप्रेसला ही माहिती मिळाली. अण्णा आणि केजरीवाल यांच्यात फूट पडण्याच्या काही महिने आधी ही घटना घडली होती. अण्णा हजारेंनी हा चेक स्वीकारण्यास नकार दिला. राजकारणात प्रवेश करण्यावरून चालू असलेल्या वादामुळे आणखी मतभेद वाढले. मात्र, अण्णांनी हा चेक स्वीकारला नव्हता.