धार्मिक सहिष्णूता : मुस्लिम मुलगी रामायण परीक्षेत पहिली

धार्मिक सहिष्णूतेचे एक चांगले उदाहरण फातिमा रहिला ही मुस्लिम मुलगी कर्नाटकातील मंगळुरू जिल्ह्यातील पुत्तुर तालुक्यातील या मुस्लिम मुलीने रामायण परीक्षेत तब्बल ९३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला आहे.  सध्या या मुलीचं कौतुक होतंय.

Updated: Feb 12, 2016, 04:29 PM IST
धार्मिक सहिष्णूता : मुस्लिम मुलगी रामायण परीक्षेत पहिली title=

कर्नाटक : धार्मिक सहिष्णूतेचे एक चांगले उदाहरण फातिमा रहिला ही मुस्लिम मुलगी कर्नाटकातील मंगळुरू जिल्ह्यातील पुत्तुर तालुक्यातील या मुस्लिम मुलीने रामायण परीक्षेत तब्बल ९३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला आहे.  सध्या या मुलीचं कौतुक होतंय.

फातिमा रहिला ही नवव्या वर्गात शिकते आणि रामायण आणि महाभारत हे तिचे आवडीचे विषय आहेत. कर्नाटक-केरळच्या सीमेवरील सुल्लीयापडावू या गावातील सर्वोदय स्कूलमध्ये ती शिकते. फातिमाचे वडील हे कारखान्यात काम करतात तर तिची आई गृहिणी आहे. 

फातिमाला या दोन्ही महाकाव्यांमधील कथांचं खूप आकर्षण होतं आणि त्यानंतर तिने रामायण-महाभारताचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. महत्वाची गोष्ट म्हणजे तिला तिच्या आई-वडीलांनीही यासाठी प्रोत्साहन दिले.