बंगळूरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बहुदा आत्तापासूनच पावसाळ्याच्या तयारीला लागलेत. कारण त्यांनी चक्क त्यांच्या पत्नीच्या साडीवरच पाणी फेकलेलं पाहायला मिळालं.
त्याचं झालं असं की, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या दावणगिरी येथील 'कर्नाटक सिल्क एम्पोरियम कॉर्पोरेशनच्या' वस्त्रोद्योग प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पोहोचलं. तिथे एका ठिकाणी त्यांना 'वॉटर-प्रूफ' साडी दिसली. केशरी रंगाची ही आकर्षक साडी त्यांनी आपल्या पत्नीसाठी विकत घेतली. साडीची किंमत होती तब्बल एक लाख आठ हजार रुपये...
आता इतकी महागडी साडी घेतल्यावर ती खरंच वॉटर-प्रूफ आहे का, याची खात्री करण्यासाठी म्हणून त्यांनी चक्क सर्वांसमोर एका ग्लालात पाणी घेतलं आणि साडीवर फेकलं.
त्यांनी घेतलेल्या या साडीत खऱ्या सोन्याचे काही धागे असल्याचीही माहिती मिळते आहे.