पत्नी, मुलांचे नाव 'भारतमाता की जय' ठेवणार : कन्हैया

जेएनयूचा विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमारने आपण आपल्या पत्नी आणि मुलांची नावे भारतमाता की जय ठेवणार आहे, असं खुद्द कन्हैयाने म्हटलं आहे.

Updated: Apr 10, 2016, 08:51 PM IST
पत्नी, मुलांचे नाव 'भारतमाता की जय' ठेवणार : कन्हैया title=

नवी दिल्ली : जेएनयूचा विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमारने आपण आपल्या पत्नी आणि मुलांची नावे भारतमाता की जय ठेवणार आहे, असं खुद्द कन्हैयाने म्हटलं आहे.

कन्हैया 'भारतमाता की जय' यावर बोलताना म्हणतो...
देश आपल्यासाठी सर्वकाही आहे आणि तुम्ही 'भारतमाता की जय' घोषणा दिल्या पाहिजेत. त्यामुळे आता मी हा निर्णय घेतला आहे, की लग्न झाल्यानंतर मी माझ्या पत्नीचे नाव बदलून 'भारतमाता की जय' ठेवणार आहे. तसेच माझ्या मुलांचीही नावे हेच असणार आहे. याबरोबरच मी माझेही नाव 'भारतमाता की जय' करुन घेणार आहे. यामुळे माझी मुले शाळेत गेली अन् त्यांना शिक्षकांनी पालकांची नावे विचारली तर ती 'भारतमाता की जय' म्हणतील. त्यामुळे त्यांना मोफत शिक्षण मिळेल आणि कसलेही शुल्क भरावे लागणार नाही.

भारतमाता की जयच्या घोषणेच्या सक्तीवरून राजकारण होत असताना, आता कन्हैयानेही यात उडी घेतली आहे. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेला कन्हैया कुमार हा सध्या सध्या महिन्यांच्या अंतरिम जामीनावर कारागृहाबाहेर आहे. कन्हैयाने सध्या देशभरात चर्चेत असलेल्या भारतमाता की जय घोषणेवर वक्तव्य केले आहे.