उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांचे फोटो व्हॉट्सअॅपवर

उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना मथुऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे.

Updated: Apr 10, 2016, 08:40 PM IST
उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांचे फोटो व्हॉट्सअॅपवर  title=

मथुरा: उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना मथुऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे. उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांचे फोटो व्हॉट्स अॅपवर टाकण्यात आले आहेत. नेम अॅण्ड शेम असं या योजनेचं नाव आहे. 

जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पथकानं उघड्यावर शौचाला बसणाऱ्या 18 जणांचे फोटो व्हॉट्सअॅपवर शेअरही केले आहेत, तसंच दुसऱ्या सोशल नेटवर्किंग साईटवरही हे फोटो टाकण्यात येणार आहेत. 

असे फोटो टाकल्यामुळे उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना लाज वाटेल आणि जिल्हा हागणदारीमुक्त होईल यासाठी ही योजना सुरु करण्यात आल्याची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली आहे.