नवी दिल्ली: देशद्रोहाचा आरोप असलेला दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारला पुन्हा एकदा मारहाण झाली आहे.
कन्हैय्यावर हल्ला केलेल्या व्यक्तीचं नाव विकास आहे, ही व्यक्ती जेएनयूमधली नसल्याचंही आता पुढे आलं आहे. देशविरोधी घोषणा दिल्यामुळे कन्हैय्यावर हल्ला केल्याची प्रतिक्रिया विकासनं दिली आहे कन्हैय्यावर हल्ला करणाऱ्या विकासला जेएनयूच्या सुरक्षा रक्षकांनी पकडलं, आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
यापूर्वी अटकेत असताना कन्हैय्याला पटियाला हाऊस कोर्टामध्ये मारहाण झाली होती. काही वकिलांनी कन्हैय्याला मारहाण केली होती.