लखनऊ : समाजवादी पक्षाच्या राज्यातील नेत्या जुही सिंह यांनी पक्ष प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर या पदावर राहण्यात काही अर्थ नसल्याचे म्हटले सांगत त्यांनी अखिलेशला पाठिंबा आहे.
मी नेताजी (मुलायमसिंग यादव) यांच्याविरोधात नाही पण मुख्यमंत्री अखिलेश यांच्याबरोबर असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, अखिलेश यादव यांना पक्षातून काढल्यानंतर अनेक नेत्यांची गोची झाली आहे. मुलायमसिंह यांच्याकडे जायचे की अखिलेश यांच्याकडे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. आज दिवसभर होणाऱ्या घडामोडीत अनेक गोष्टी समोर येणार आहेत.
तर दुसरीकडे अखिलेश यांच्यावर अमरसिंग यांनी हल्लाबोल केलाय. एकेकाळी मुलायमसिंहांपासून दूर झालेले अमरसिंग यांनी मात्र अखिलेश यांच्यावर उपरोधिक टीका करत मुलायमसिंग यांची बाजू घेतली आहे.
When my CM is suspended then its my responsibility to resign as spokesperson too.Not against Netaji but we stand with our CM:Juhi Singh,SP pic.twitter.com/8dEpGEkL8g
— ANI UP (@ANINewsUP) December 31, 2016
‘आज तो कुछ ऐसा लग रहा है कि राम चंद्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा, बेटा करेगा राज बेचारा बाप जंगल को जाएगा’, अशा शब्दांत त्यांनी अखिलेश यांना फटकारले आहे. अखिलेश यांनी पक्षाचा अवमान केला असून त्याची शिक्षा म्हणूनच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे अमरसिंग म्हणाले.
Mai apna poora samarthan netaji ko deta hoon, unki avmanna party ka anushasan bhang karne ke samaan hai. : Amar Singh on SP feud pic.twitter.com/921jwldtQT
— ANI UP (@ANINewsUP) December 31, 2016