देशद्रोहाचा आरोप : उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य यांना अंतरिम जामीन

देशद्रोहाचा आरोप असेलल्या उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केलाय.

PTI | Updated: Mar 18, 2016, 09:02 PM IST
देशद्रोहाचा आरोप : उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य यांना अंतरिम जामीन title=

नवी दिल्ली : देशद्रोहाचा आरोप असेलल्या उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केलाय.

प्रत्येकी २५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना सहा महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आलाय. 

उमर आणि अनिर्बान हे उच्चशिक्षित असून त्यांची पार्श्वभूमी निर्विवाद असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. या दोघांनाही दिल्ली सोडून न जाण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. 

जेएनयूमध्ये अफजल गुरूच्या समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित करून देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप या दोघांवर आहे.