'१५५५ मध्ये झाली होती मोदी युगाची भविष्यवाणी'

केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी दावा केला आहे की विख्यात फ्रांसच्या भविष्यवाणी करणाऱ्या नोस्त्रदामस यांनी भारतात मोदी युग येणार असल्याची घोषणा केली होती.

Updated: Mar 18, 2016, 08:48 PM IST
'१५५५ मध्ये झाली होती मोदी युगाची भविष्यवाणी' title=

मुंबई : केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी दावा केला आहे की विख्यात फ्रांसच्या भविष्यवाणी करणाऱ्या नोस्त्रदामस यांनी भारतात मोदी युग येणार असल्याची घोषणा केली होती.

अमेजिंग फॅक्टस या फेसबूक पोस्टमध्ये रिजीजू यांनी २०१४ मधील लोकसभा निवडणूकांमध्ये अकांचं गणित किती महत्त्वाचं होतं हे सांगितलंय.

आताची स्थिती

भाजप - २८३ जागा 2+8+3 = 13

एनडीए - ३३७ जागा ३+३+७ = १३

युपीए - ५८ जागा ५+८ = १३

इतर -१४८ जागा १+४+८ = १३

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भविष्यवाणी २५० वर्ष अगोदर केली गेली होती. नोस्त्रदामस यांच्या मते, ज्या व्यक्तीला सुरुवातील लोकं पसंद नाही करणार पण नंतर लोकं त्या व्यक्तीला पसंद करु लागतील. हा व्यक्ती देशाची दिशा बदलवेल.

१५५५ मध्ये नोस्त्रदामसने ही भविष्यवाणी केली होती. एक प्रशासक भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी सुवर्ण दिवस आणेल. या व्यक्तीच्या नेतृत्वात भारत महाशक्ती बनेल आणि अनेक देश भारताच्या शरण येतील.