झारखंडमध्ये पंतप्रधानांच्या समोर मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन... काँग्रेसशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या विरोधात भूमिका घेतलीय. 

Updated: Aug 21, 2014, 01:27 PM IST
झारखंडमध्ये पंतप्रधानांच्या समोर मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी title=

रांची : अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन... काँग्रेसशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या विरोधात भूमिका घेतलीय. 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमध्ये ग्रिड योजनेचं उद्घाटन करण्यासाठी दाखल झाले आहेत. जाहीर भाषणादरम्यान मोदींच्या सभेत जेव्हा सोरेन यांनी भाषण देण्यास सुरुवात केली तेव्हा गर्दीनं हुल्लडबाजी सुरू केली. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु होती. पंतप्रधान मोदींच्या समोरच ही हुल्लडबाजी सुरू होती. त्यामुळे पंतप्रधानांना गर्दीसमोर शांततेचं आवाहन करावं लागलं. 

सभेअगोदर झारखंड मुक्ती मोर्चाचे महासचिव सुप्रियो भट्टाचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून लिहिलेलं एक पत्र मीडियासमोर जाहीर केलं होतं. यामध्ये पंतप्रधानांना आग्रह करण्यात आला होता की, हरियाणच्या मुख्यमंत्र्यंसोबत जे घडलं त्याची पुनरावृत्ती झारखंडमध्ये होता कामा नये... इथली जनता याला सहन करणार नाही... 

यापूर्वी, हरियाणात झालेल्या एका जाहीर सभेत पंतप्रधानांच्या उपस्थितीत गर्दीतल्या काही लोकांनी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. आपल्या हुटिंगमुळे नाराज झालेल्या हुड्डा यांनी पंतप्रधानांसोबत यापुढे कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही, अशी घोषणाच करून टाकली. 

काँग्रेस पक्षाच्या निर्देशानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प़ृथ्वीराज चव्हाण यांनीही आज नागपूरमध्ये पंतप्रधान मोदींसोबत होणाऱ्या एका कार्यक्रमाचा दौरा रद्द केलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.