गारपिटग्रस्तांच्या यादीत खासदार जया बच्चन

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीचा सिने अभिनेत्री आणि राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांना फटका पडला आहे.

Updated: May 1, 2014, 01:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीचा सिने अभिनेत्री आणि राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांना फटका पडला आहे. भोपाळ जिल्हा प्रशासनाने गारपिटग्रस्तांच्या मदतीसाठी तयार केलेल्या यादीत अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांच नाव आहे.
या यादीत जया बच्चन यांच्याशिवाय माजी मंत्री इंद्रजीत पटेल आणि आयएएस अधिकारी विनोद सेमवाल यांच नाव देखील टाकण्यात आलं आहे. जया बच्चन यांची बिसनखेडीमध्ये ५ एकर जमीन आहे. या ५ एकर शेतीच्या गारपिटग्रस्त मदतीसाठी जया यांना १४ हजार रूपये मिळणार आहेत. या आधी जया बच्चन यांनी बड्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात येणा-या या जमिनीवर विकासाची परवानगी घेण्यावरून वाद झाला होता.
आचारसंहिता संपल्यानंतर गारपिटग्रस्तांना मदतीसाठी चेक मिळणार आहे. जया बच्चन प्रमाणेच भोपाळमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींनी शेतीसाठी जमीन घेतलेली आहे. या कारणाने अनेक मोठ्या व्यक्तींची नाव गारपिटग्रस्तांच्या यादीत नाव टाकण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.