जेटली सर्वात श्रीमंत मंत्री, मोदींची १.२६कोटींची संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ १.२६ कोटीं रुपये इतकी संपत्ती आहे. तर संरक्षण आणि अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारमधील सर्वाधिक श्रीमंत मंत्री आहे. त्यांच्याजवळ ७२.१० कोटी रुपये एकूण संपत्ती आहे. 

Updated: Oct 7, 2014, 09:58 AM IST
जेटली सर्वात श्रीमंत मंत्री, मोदींची १.२६कोटींची संपत्ती title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ १.२६ कोटीं रुपये इतकी संपत्ती आहे. तर संरक्षण आणि अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारमधील सर्वाधिक श्रीमंत मंत्री आहे. त्यांच्याजवळ ७२.१० कोटी रुपये एकूण संपत्ती आहे. 

पंतप्रधान आणि मंत्रीमंडळातील ४४ मंत्र्यांची संपत्ती आणि इतर माहिती घोषित करण्याक आलीय. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू मोदी सरकारमधील सर्वात गरीब मंत्री आहे. त्यांच्याजवळ २०.४५ रुपये इतकी संपत्ती आहे. पीएमओ वेबसाइटवर ही माहिती आता सार्वजनिक करण्यात आलीय.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण २२ कॅबिनेट मंत्र्यांपैकी १७ मंत्री कोट्यधीश आहे. 

पाहा कोणत्या मंत्र्याची किती आहे संपत्ती-

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी- १.२६ कोटी
  • अरूण जेटली, संरक्षण आणि अर्थमंत्री - ७२.१० कोटी
  • राजनाथ सिंह, गृहमंत्री – २.५६ कोटी 
  • सुषमा स्वराज, परराष्ट्र मंत्री – २.७३ कोटी
  • रविशंकर प्रसाद, कायदा व दूरसंचार मंत्री – १४.९१ कोटी
  • नितीन गडकरी, परिवहन मंत्री – ३.३४ कोटी
  • उमा भारती, जलसंपदा मंत्री – १.६२ कोटी
  • जुएल उरांव, आदिवासी विकास मंत्री – १.७७ कोटी
  • प्रकाश जावडेकर - १.०५ कोटी
  • राधामोहन सिंह, कृषिमंत्री – २.४७ कोटी
  • स्मृति इराणी, मानव संसाधन मंत्री – ४.१५ कोटी 
  • निर्मला सीतारमण – १.०३ कोटी
  • जितेंद्र सिंह – २.६७ कोटी
  • महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी - ३७.६८ कोटी  
  • पियुष गोयल, ऊर्जा मंत्री – ३१.६७ कोटी
  • नजमा हेपतुल्ला, अल्पसंख्यांक मंत्री – २९.७० कोटी
  • किरण रिजिजू – ६६.६५ लाख
  • कलराज मिश्र – ७१.११ लाख    
  • जनरल व्ही. के. सिंह – ६८.७६ लाख
  • रामविलास पासवान, खाद्य मंत्री – ३९.८८ लाख रुपये
  • नरेंद्र सिंह तोमर, रोजगार मंत्री – ४४.९० लाख रुपये
  • हर्ष वर्धन, आरोग्य मंत्री – ४८.५४ लाख रुपये
  • अनंत कुमार, रसायने आणि खते मंत्री – ६०.६२ लाख
  • व्यंकय्या नायडू - २०.४५ लाख

 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.