पाकचा पुन्हा गोळीबार ५ गावकरी ठार, ३४ जण जखमी

पाकिस्तानी सैन्याच्या मुजोर कुरापती अद्यापही थांबलेल्या नसून, पाकनं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर जम्मू आणि पूंछ सेक्टरमध्ये भीषण गोळीबार केला़य. यात ५ भारतीय गावकरी ठार तर ३४ जण जखमी झाले आहेत.

IANS | Updated: Oct 7, 2014, 07:15 AM IST
पाकचा पुन्हा गोळीबार ५ गावकरी ठार, ३४ जण जखमी title=

जम्मू : पाकिस्तानी सैन्याच्या मुजोर कुरापती अद्यापही थांबलेल्या नसून, पाकनं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर जम्मू आणि पूंछ सेक्टरमध्ये भीषण गोळीबार केला़य. यात ५ भारतीय गावकरी ठार तर ३४ जण जखमी झाले आहेत.

गेल्या चार दिवसांत पाकिस्ताननं केलेली शस्त्रसंधीच्या भंगाची ही ११ वी घटना आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री अरुण जेटली तसंच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला गर्भीत इशारा दिला.
पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू जिल्ह्याच्या अरनिया पट्ट्यात १० सीमा चौक्या आणि रहिवासी भागाला लक्ष्य केलं. पाकिस्तानी सैन्यानं रविवारी रात्री १० वाजता गोळीबार सुरू केला आणि मोर्टार डागले. 

सोमवारीही राहून राहून गोळीबार सुरू होता़. त्यात जखमी गावकऱ्यांची मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. लवकरच ते गोळीबार झालेल्या सीमेलगतच्या अर्निया गावालाही भेट देणार आहेत. 

बकरी ईदच्या दिवशीही कुरापत! भारत-पाक दोन्ही बाजूंनी बकरी ईदची तयारी सुरू असतानाच सकाळी पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेवर भीषण गोळीबार केला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.