जाट समाजाचं आंदोलन लवकरच मागे

सरकारने मागण्या मान्य केल्याचा दावा केला आहे.

Updated: Feb 21, 2016, 09:22 PM IST
जाट समाजाचं आंदोलन लवकरच मागे title=

नवी दिल्ली : जाट समाजाला ओबीसी आरक्षण विधेयक मांडण्याचे आश्वासन देण्यात आले आहे, जाट नेता जयपालसिंह सांगवान यांनी आंदोलन संपवण्याचे आवाहन केले आहे, सरकारने मागण्या मान्य केल्याचा दावा केला आहे. यामुळे जाट समाज आंदोलन मागे घेण्याची शक्यता वाढली आहे.

जाट समाजाला ओबीसी आरक्षण देणारे विधेयक हरयाणा विधानसभेत सादर केले जाईल, असे भाजप नेते अनिल जैन यांनी रविवारी सांगितले. रविवारी दुपारी जाट नेत्यांच्या शिष्टमंडळाने  केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर जैन यांनी ही माहिती दिली.
 
जाट समाजाच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल असेही जैन यांनी सांगितले. सरकारने ही आश्वासने देऊन एकप्रकारे आरक्षणासाठी हिंसाचार करणा-या आंदोलकांपुढे नमते घेतले आहे.