मुलीला जन्म दिला म्हणून सासूने दिली महागडी गाडी

मुलगी झाली म्हणून सुनेचा छळ केला, तिला मारले अशा प्रकारच्या बातम्य आपण ऐकत, वाचत असतो. वंशाचा दिवा मुलगाच हवा असा सासऱच्यांचा हट्ट असतो. त्या हट्टापायी अनेक मुली गर्भातच मारल्या जातात. 

Updated: Nov 6, 2016, 09:00 AM IST
मुलीला जन्म दिला म्हणून सासूने दिली महागडी गाडी title=

लखनऊ : मुलगी झाली म्हणून सुनेचा छळ केला, तिला मारले अशा प्रकारच्या बातम्य आपण ऐकत, वाचत असतो. वंशाचा दिवा मुलगाच हवा असा सासऱच्यांचा हट्ट असतो. त्या हट्टापायी अनेक मुली गर्भातच मारल्या जातात. 

मात्र मुलगी झाली म्हणून आनंदित झालेल्या आपल्या सुनेला सासूने चक्क महागडी भेट देत आपला आनंद व्यक्त केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडलीये.

सुनेने कन्यारत्नाला जन्म दिला म्हणून सासूने चक्क आपल्या सुनेला होंडा सिटी कार गिफ्ट दिली. आरोग्य विभागातील निरीक्षक पदावरुन निवृत्त झालेल्या प्रेमा देवी यांचा हा आदर्श प्रत्येक सासूने घेण्यासारखाच आहे. आपल्या मुलाला कन्यारत्नाचा लाभ झाल्याने अत्यानंदित झालेल्या या सासूने सुनेला होंडा सिटी कार गिफ्ट केली.