'मोदी सरकारमधील मंत्री अहंकारी'

योगगुरू बाबा रामदेव यांनी असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटेल, पण  योगगुरू बाबा रामदेव यांनी "मोदी सरकारमधील मंत्री अहंकारी आहेत" असं म्हटलं आहे.

Updated: May 21, 2015, 04:48 PM IST
'मोदी सरकारमधील मंत्री अहंकारी'  title=

नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांनी असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटेल, पण  योगगुरू बाबा रामदेव यांनी "मोदी सरकारमधील मंत्री अहंकारी आहेत" असं म्हटलं आहे.

राहुल गांधींची त्यांनी स्तुती केली आहे, तर मोदी सरकारच्या शेतकऱ्यांसंबधीच्या धोरणावर टीका केली आहे. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त बाबा रामदेव यांनी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.

भूसंपादनाचा मुद्दा हा केवळ काही भागांशी संबंधित असल्याचेही ते पुढे म्हणाले. कॉंग्रेसचे कौतुक करताना रामदेवबाबांनी शेतकऱ्यांचा प्रश्‍न उचलून धरण्यात कॉंग्रेस यशस्वी ठरल्याचे सांगितले. सरकारमधील मंत्री अहंकारी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरुण जेटली, अमित शहा आपले दूरध्वनी क्रमांक बदलणे चुकीचे असल्याचे ते पुढे म्हणाले.

"आता सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वास पुन्हा एकदा जिंकणे आवश्‍यक आहे. त्यांच्यासाठी सरकारने नवे धोरण तयार करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांना अकुशल कामगार समजले जाणे दुर्दैवी आहे, वीजपुरवठा, खते आणि पाणी तसेच किमान आधारभूत मूल्य देणे आवश्‍यक आहे' असे रामदेवबाबा पुढे म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.