'PSLV सी-23'चं यशस्वी उड्डाण, अंतराळात भारताची भरारी

PSLV सी-23 या उपग्रह प्रक्षेपक यानाचं आज श्रीहरिकोटा इथल्या धवन अवकाश केंद्रातून उड्डाण झालंय. सकाळी 9.52 मिनिटांनी यान अवकाशात झेपावलं. या उड्डाणामुळं भारतानं अंतराळ क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Updated: Jun 30, 2014, 05:17 PM IST
'PSLV सी-23'चं यशस्वी उड्डाण, अंतराळात भारताची भरारी title=

श्रीहरिकोटा : PSLV सी-23 या उपग्रह प्रक्षेपक यानाचं आज श्रीहरिकोटा इथल्या धवन अवकाश केंद्रातून उड्डाण झालंय. सकाळी 9.52 मिनिटांनी यान अवकाशात झेपावलं. या उड्डाणामुळं भारतानं अंतराळ क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून आज सकाळी 9 वाजून 52 मिनिटांनी पीएसएलव्ही सी-23चं उड्डाण झालं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएसएलव्ही सी 23 च्या यशस्वी उड्डाणाबद्दल इस्त्रोच्या सर्व वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. वैज्ञानिकांच्या शोधांमुळं सामान्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल होतात, असं म्हणत त्यांनी वैज्ञानिकांना कौतुकाची थापही दिली.

 कॅनडा, जर्मनी, फ्रान्स आणि सिंगापूरचे पाच वेगवेगळ्या वजनाचे उपग्रह आज अंतराळात पाठवण्यात आले. उपग्रह ध्रुवीय कक्षेत स्थापित करण्याचं तंत्रज्ञान जगातील मोजक्या देशांकडे उपलब्ध आहे, त्यात भारताचाही समावेश झालाय.

उपग्रहांची नावं

  • फ्रान्सचा 714 किलोग्रॅमचा एसपीओटी-7

  • जर्मनी 14 किलोग्रॅमचा एआयएसएटी

  • कॅनडाचा 15 किलोग्रॅमचा एनएलएस 7.1 (सीएएन-एक्स 4) आणि एनएलएस 7.2 (सीएएन-एक्स 5)

  • सिंगापूरचा सात किलोग्रॅमचा व्हीईएलओक्स-1

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत ट्वीटही केलंय.

Will be in Sriharikota this evening & tomorrow morning for launch of PSLV-C23. Will meet scientists during my visit. Looking forward.

— Narendra Modi (@narendramodi) June 29, 2014

 

Our space programme has overcome many  hurdles. At the same time it is one of the most cost effective programmes. This should make us proud.

— Narendra Modi (@narendramodi) June 30, 2014

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.