भारताची दिशादर्शक भरारी, नवा उपग्रह झेपावला

अमेरिकेरची ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) प्रमाणे भारताची अशीच सिस्टिम (दिशादर्शक व्यवस्था) असणारा `आयआरएनएसएस-1 बी` हा दुसरा उपग्रह भारताच्यावतीने अंतराळात पाठवण्यात आलाय.

Updated: Apr 5, 2014, 12:34 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, श्रीहरिकोटा
अमेरिकेरची ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) प्रमाणे भारताची अशीच सिस्टिम (दिशादर्शक व्यवस्था) असणारा `आयआरएनएसएस-1 बी` हा दुसरा उपग्रह भारताच्यावतीने अंतराळात पाठवण्यात आलाय.
श्रीहरीकोटा इथून शुक्रवारी सायंकाळी 5 वाजून 14 मिनिटांनी हा उपग्रह अवकाशात झेपावला. या मोहिमेअतंर्गत एकूण सात उपग्रह पाठवण्यात येणार असून, हा या मालिकेतील दुसरा उपग्रह आहे. 1 हजार 434 किलोग्रॅम वजनाच्या या उपग्रहाचे आयुष्य 10 वर्ष आहे.
या मोहिमचे नियंत्रण कर्नाटकातील हसन येथील नियंत्रण कक्षेकडे देण्यात आले आहे. भारताचं `आयआरएनएसएस` यंत्रणेच्या दृष्टीने महत्त्वाची भरारी आहे. आता भारत अमेरिकेच्या पंक्तित जाऊन बसला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.