राहुल गांधींना मंगलोरमध्ये काळे झेंडे

मंगलोरमधील जाहीर सभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना काळे झेंडे दाखवणा-यांना ताब्यात घेण्यात आलंय. राहुल यांच्या भाषणा दरम्यान काही लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 5, 2014, 11:47 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मंगलोर
मंगलोरमधील जाहीर सभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना काळे झेंडे दाखवणा-यांना ताब्यात घेण्यात आलंय. राहुल यांच्या भाषणा दरम्यान काही लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते.
या सभेत राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केलीय. देशाला चौकीदाराची गरज नसल्याची टीका त्यांनी मोदींवर केलीय.
शेतकरी, दलित आणि महिला अशा सर्व घटकांना एकत्र घेऊन काँग्रेसला विकास साधायचा आहे, असा दावा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय.
यवतमाळमध्ये राहुल गांधी यांची प्रचारसभा झाली, या सभेत राहुल यांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मॉडेलवर हल्ला चढवला. भाजपशासित राज्यातल्या सत्ताधा-यांना शेतक-यांच्या वेदना ऐकू येत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
यवतमाळचे काँग्रेस उमेदवार शिवाजीराव मोघे आणि चंद्रपूरचे उमेदवार संजय देवतळे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,तसंच राज्याचे प्रभारी मोहन प्रकाशही उपस्थित होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.