www.24taas.com,श्रीहरीकोटा
इस्रोचं अंतराळात १००वं स्पेस मिशन असलेलं भारताच्या मिशन मंगळला सुरुवात झालीय. मंगळावर पाण्याचा शोध घेण्यासाठी PSLV C-२१ आज सकाळी ९ वाजून ५१ मिनीटांनी अवकाशात झेपावलंय.
श्रीहरीकोटामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपती या क्षणाचे साक्षीदार बनले. भारताचं हे अंतरिक्ष यान मंगळाभोवती फिरत असतानाच मंगळावरची माती आणि त्यातील अवशेषांची तपासणी करेल. अमेरिकेनेही मंगळावर कारच्या आकाराचं रोवर मंगळावर पाठवलं आहे.
मात्र अमेरिकेच्या मिशन मंगळपेक्षा भारताचं मिशन मंगळ ३०पटीने स्वस्त आहे. अमेरिकेचं प्रोजेक्ट १३ हजार कोटींचं आहे. तर भारताचं मिशन मंगळ ४५०कोटींचं.. काही वर्षांपूर्वी भारताच्याच चंद्रयान मिशनने चंद्रावर पाणी असल्याचं स्पष्ट केलं होतं.