इसिसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी

इराक आणि सीरियामध्ये दहशत पसरविल्यानंतर इसिसने आता भारताविरोधात युद्धाची घोषणा केलीय. इसिसने 'फ्युचर इस्लामिक स्टेट बॅटल' या पुस्तकात ही घोषणा केलीये. यासोबतच यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकीही देण्यात आली आहे. 

Updated: Dec 3, 2015, 12:24 PM IST
इसिसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी title=

नवी दिल्ली : इराक आणि सीरियामध्ये दहशत पसरविल्यानंतर इसिसने आता भारताविरोधात युद्धाची घोषणा केलीय. इसिसने 'फ्युचर इस्लामिक स्टेट बॅटल' या पुस्तकात ही घोषणा केलीये. यासोबतच यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकीही देण्यात आली आहे. 

इसिस सीरियाबाहेर येण्यास तयार असून ते भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात दाखल होतील असे पुस्तकात म्हटले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचाही समावेश करण्यात आलाय. तसेच त्यांचा उल्लेख इस्लामचे शत्रू असा केला आहे. 

ऑनलाईन मॅनिफेस्टोमध्ये इसिसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कट्टपर हिंदू राष्ट्रवादी असल्याचे संबोधित केलेय. मीडिया रिपोर्टनुसार, भारताचे पंतप्रधान हत्यारांची पूजा करता. ते आपल्या लोकांना मुसलमान लोकांच्याविरोधात लढण्यासाठी तयार करत असल्याचे पुस्तकात म्हटले आहे.

इसिसने आपल्या प्रकाशना पहिल्यांदा भारतातील राजकीय परिस्थितीबाबतचा उल्लेख केलाय. भारतात हिंदुंचे आंदोलन वाढत आहे. गोमांस खाणाऱ्या मुसलमानांची हत्या केली जातेय, असेही पुस्तकात नमूद करण्यात आलेले आहे.  
दरम्यान, इसिसच्या धमकीनंतर देशातील अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आलीये.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.