दाऊदच्या टोळीमधील गँगस्टर पोलिसांच्या जाळ्यात

गेल्या महिन्यात गुजरातमधील भरूच जिल्हातील दोन भाजप नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील गँगस्टरला नेपाळ पोलिसांच्या सहकार्याने सुरक्षा यंत्रणेला भारत नेपाळच्या सीमेवर अटक करण्यात आली.

Updated: Dec 3, 2015, 10:53 AM IST
दाऊदच्या टोळीमधील गँगस्टर पोलिसांच्या जाळ्यात title=

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात गुजरातमधील भरूच जिल्हातील दोन भाजप नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील गँगस्टरला नेपाळ पोलिसांच्या सहकार्याने सुरक्षा यंत्रणेला भारत नेपाळच्या सीमेवर अटक करण्यात आली.
 
दाऊदच्या टोळीतील गँगस्टरच्या यादीतील जावेद चिकनाचा भाऊ आबिद पटेलला नेपाळला पळून जात असताना अटक करण्यात आल्याचे कळले आहे. गुजरात येथील दोन भाजप नेत्यांच्या हत्यामागे आबिदचा हात असल्याच्या संशयावरून सुरक्षा यत्रंणा त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. यावेळीच केंद्रीय सुरक्षा यंत्रणेला माहिती मिळाली, आबिद बिहार मार्गाने नेपाळला जाणार आहे.

सुरक्षा यंत्रणानी नेपाळ पोलिसांना यांची माहिती दिली आणि नेपाळ सीमेत दाखल होऊन संयुक्त योजना राबवून कारवाई करत आबिदला अटक केली. त्याला गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तेथे हत्येच्या संदर्भात त्यांच्यावर खटला चालवण्यात येईल.

भरूच जिल्हातील पूर्व भाजप अध्यक्ष आणि आरएसएसचे सदस्य शिरीष बंगाल तसेच भरूच विभागाचे महासचिव प्रग्नेश मिस्त्री यांची दोन अज्ञात इसमांनी २ नोव्हेंबरला गोळ्या घालून हत्या केली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.