अहमदाबाद : डी.जी वंजारा यांनी जेलमधून बाहेर पडताबरोबर अच्छे दिन आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. डी. जी. वंजारा हे सोहराबुद्दीन शेख आणि इशरत जहाँ चकमक प्रकरणातील आरोपी आहेत.
वंजारा यांची आज या प्रकरणात कारागृहातून सुटका झाली. वंजारा कारागृहातून बाहेर पडताच फाटके फोडण्यात आले. तसेच त्यांना हार घालून त्यांची एखाद्या निवडणुकीतील विजयी उमेदवाराप्रमाणे खुल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.
वंजारा यांच्यावर दोन चकमक प्रकरणाचे आरोप आहेत. त्यांना या महिन्याच्या सुरवातीला जामीन मंजूर झाला होता. अखेर ते आज सुमारे आठ वर्षांनंतर कारागृहाबाहेर आले आहेत.
न्यायालयाने वंजारा यांना गुजरातमध्ये प्रवेश न करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे. दोन बनावट चकमकीत सात जण ठार झाल्याप्रकरणी वंजारा यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.