नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आठवड्यातून तीन वेळा जनता दरबार घेणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
दिल्लीमध्ये पहिल्यांदा जनता दरबाराचे आयोजन ११ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी नागरिकांची प्रचंड संख्या होती.
सुरक्षिततेच्या कारणास्तव केजरीवाल यांना दुसरीकडे हलविण्यात आल्याने जनता दरबार रद्द झाला होता. या घटनेनंतर केजरीवाल यांनी नागरिकांची माफी मागितली होती.
विधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांनी जनता दरबार घेणार असल्याचे आश्वासन दिले होते.
बुधवार, गुरुवार व शुक्रवारी पक्षाच्या कौशंबी येथील कार्यालयात जनता दरबार घेतला जाणार आहे. मात्र, यावेळी नियोजनबद्ध कार्यक्रम असणार आहे, असेही सूत्रांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.