www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एटीएममध्ये जर तुमच्यावर हल्ला झाला, तर तुम्हाला आता यावर विमा संरक्षण असणार आहे. एटीएमचा वापर करणाऱ्या ग्राहकांना एटीएमच्या आत हल्ला झाल्यास विमा संरक्षण देण्यावर, बँकाचा विचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
बंगळूरूत एका महिलेवर चोरीच्या उद्देशाने एक हल्ला झाला होता. या हल्ल्याची सीसीटीव्ही दृश्य देशभर थरकाप उडवणारी होती. यामुळे एटीएम संरक्षणाचा विषय चर्चेला आला होता.
मात्र काही बँकांनी सुरक्षा रक्षक पुरवणं परवडत नसल्याचंही म्हटलं होतं. मात्र आता विमा संरक्षण मिळणार असल्याचं ग्राहकांच्या मनातली भीती थोड्याफार प्रमाणात कमी होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.