इन्फोसिसचा दिवाळीपूर्वीच बोनसचा धमाका

इन्फोसिसने आपल्या शेअर धारकांना दिवाळीपूर्वीच बोनस जाहीर करून आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

Updated: Oct 10, 2014, 11:15 PM IST
इन्फोसिसचा दिवाळीपूर्वीच बोनसचा धमाका title=

बंगळुरू : इन्फोसिसने आपल्या शेअर धारकांना दिवाळीपूर्वीच बोनस जाहीर करून आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

इन्फोसिसने आज एकास एक बोनस जाहीर करून गुंतवणूकदारांना खूष करून टाकले. 

कंपनीने वीस वर्षांत तिसऱ्यांदा बोनस शेअर जाहीर केला आहे. तिशेअर तीस रुपये लाशांश जाहीर करण्यात आला आहे. 

दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 28.6 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने प्रतिशेअर तीस रुपये हंगामी लाशांशही जाहीर 

केला आहे. 

कंपनीच्या मूळ संस्थापकांव्यतिरिक्त असलेले विशाल सिक्का यांच्याकडे कंपनीची सूत्रे गेल्यानंतर दोन महिन्यांत हे 

निकाल जाहीर झाले आहेत. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीचा नफा 2,407 कोटी रुपयांवरून वाढून 3,096 कोटी 

रुपयांवर गेला आहे. 

कंपनीचे उत्पन्न 6.5 टक्‍क्‍यांनी वाढून 2.2 अब्ज डॉलरवर पोचले. कंपनीने या वर्षात अमेरिकी डॉलरमधील उत्पन्न सात 

ते नऊ टक्‍क्‍यांनी वाढेल, असे अनुमान (फोरकास्ट) वर्तवले आहे.

 ""डिजिटल बदल आमच्या प्रत्येक ग्राहकाच्या व्यवसायांतही बदल घडवून आणत आहेत. आम्ही आमच्या प्रत्येक 

व्यवसायाचा गाभा पुनरुज्जीवित करण्यासाठी या बदलांकडे एक संधी म्हणून पाहत आहोत,‘‘ असे कंपनीचे 

व्यवस्थापकीय संचालक विशाल सिक्‍का यांनी सांगितले. 

इन्फोसिसचा शेअर आज राष्ट्रीय शेअर बाजारात 6.51 टक्‍क्‍यांनी वधारून 3,884 रुपयांवर पोचला. कंपनीने दुसऱ्या 

तिमाहीत 14,255 कर्मचाऱ्यांची भरती केली असून, कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 1,65,411 इतकी झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.