इंदि‍रा गांधींच्या घरात अमेरिकन गृप्तहेर?

इंदिरा गांधींनी पाकिस्तानपुढे अणुतंत्रज्ञान देण्याचा प्रस्ताव ठेवल्याचा गौप्यस्पोट विकिलीक्सनं केल्यानं खळबळ उडालीये. अमेरिकन दूतावासाच्या एका रिपोर्टच्या आधारावर विकिलिक्सने ही खळबळजनक माहिती उघड केलीये.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 10, 2013, 02:02 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
आणबाणीच्या काळात इंदि‍रा गांधींच्या घरात अमेरिकन गृप्तहेर वास्तव्यास होता, असा गौप्यस्पोट विकिलीक्सनं केला आहे.
आणबाणीच्या काळात इंदि‍रा गांधींच्या घरात अमेरिकन गृप्तहेर वास्तव्यास होता. इंदिरा गांधींचे राजकारण तो समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा '‍विकिलीक्स'ने एका खुलाशाद्वारे केलाय.
वि‍कीलीक्‍सनुसार नवी दि‍ल्‍लीतील अमेरि‍कन दूतावासातर्फे अनेक वेळा जाहीर करण्‍यात आले होते की, तत्कालीन पंत‍प्रधान इंदिरा गांधीच्या घरात एक गृप्तहेर वावरत आहे. विकिलीक्सने यासाठी १९७६ मध्ये जारी केलेल्या गोपनिय दस्तावेजचा हवाला दिलाय.

`इंदिरा गांधी देणार होत्या पाकला अणुतंत्रज्ञान`
इंदिरा गांधींनी पाकिस्तानपुढे अणुतंत्रज्ञान देण्याचा प्रस्ताव ठेवल्याचा गौप्यस्पोट विकिलीक्सनं केल्यानं खळबळ उडालीये. अमेरिकन दूतावासाच्या एका रिपोर्टच्या आधारावर विकिलिक्सने ही खळबळजनक माहिती उघड केलीये.
१९७४ मध्ये आण्विक चाचणीनंतर भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांना एका पत्राद्वारे स्पष्ट केलं होतं की भारत शांततेच्या कामासाठी पाकिस्तानसोबत आण्विक तंत्रज्ञानांचं आदान प्रदान करण्यास तयार आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर विचित्र आरोप करत विकिलीक्स पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलीये.
१९७५ ते १९७७ दरम्यान इंदिरा गांधीच्या घरात अमेरिकन गृप्तहेर वास्तव्य करत होता. विकिलीक्सने यापूर्वी राजीव गांधी यांच्याबाबत खुलासा केला होता. राजीव गांधी स्वीडिश कंपनीचे एजंट असल्याचे म्हटले होते.
२६ जून १९७५ रोजी इंदि‍रा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशीच अमेरि‍कन दूतावासाने एक केबलमध्ये इंदि‍रा गांधींची भूमिका आणि संजय गांधी तसेच त्यांचे सचिव आर.के.धवन यांच्या बाबतचे खुलासे जाहीर केले होते.