भारत २२ सॅटेलाईट एकत्र करणार लॉन्च

देश एक नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. लवकरच भारत हा एकसोबत २२ सॅटेलाईटचं प्रक्षेपण करणार आहे. यामध्ये परदेशातील माइक्रो आणि नॅनो या सॅटेलाईटचा ही समावेश आहे.

Updated: Mar 29, 2016, 09:54 PM IST
भारत २२ सॅटेलाईट एकत्र करणार लॉन्च title=

तिरुवनंतपूरम : देश एक नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. लवकरच भारत हा एकसोबत २२ सॅटेलाईटचं प्रक्षेपण करणार आहे. यामध्ये परदेशातील माइक्रो आणि नॅनो या सॅटेलाईटचा ही समावेश आहे.

भारतीय आंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या पीएसएलव्ही सी३४ या स्वदेशी काटोर्सेट २ सी सोबत अनेक देशांचे २१ सॅटेलाईट लॉन्च करण्यात येणार आहे. यामध्ये अमेरिका, कॅनडा, इंडोनेशिया आणि जर्मनी या देशांच्या सॅटेलाईटचा समावेश आहे.

विक्रम साराभाई प्रक्षेपण केंद्राचे डायरेक्टर यांनी सांगितलं की, 'आमची योजना २२ सॅटेलाईटचं प्रक्षेपण करण्याची आहे. याआधी एकाच वेळी १० सॅटेलाईट एकाच वेळी प्रक्षेपण करण्यात आले होते. आता हे दुप्पट करत आहोत. मे मध्ये याचं प्रक्षेपण होणं अपेक्षित आहे.'

नासाने २०१३ मध्ये एकसोबत २९ सॅटेलाईट लॉन्च केले होते जो एक विक्रम आहे. त्यानंतर आता इस्रो २२ सॅटेलाईट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.