आयफेल टॉवरपेक्षाही उंच रेल्वे पूल भारतात उभारणार

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय रेल्वे आयफेल टॉवरपेक्षाही अधिक उंचीचा पूल उभारणार आहे. चिनाब नदीवर भारतीय रेल्वे ३५९ मीटर उंचीचा पूल बांधणार आहे. हा पूल आयफेल टॉवरहून ३५ मीटरहून अधिक उंच असणार. 

Updated: Dec 18, 2015, 10:43 AM IST
आयफेल टॉवरपेक्षाही उंच रेल्वे पूल भारतात उभारणार title=
सौजन्य : ट्विटर

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय रेल्वे आयफेल टॉवरपेक्षाही अधिक उंचीचा पूल उभारणार आहे. चिनाब नदीवर भारतीय रेल्वे ३५९ मीटर उंचीचा पूल बांधणार आहे. हा पूल आयफेल टॉवरहून ३५ मीटरहून अधिक उंच असणार. 

हा पूल इतका मजबूत असेल की ८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकपानेही या पुलाला धक्का पोहोचणार नाही. रेल्वेने ट्विटरवरुन ही माहिती दिलीय. 

हा पूल चिनाब नदीवर रियासी जिल्ह्याच्या बक्कल आणि कोरीदरम्यान बांधण्यात येतोय. हा पूल १३१५ मीटर लांब असेल. मार्च २०१६ मध्ये हा पूल बांधून होईल. हा जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल असेल. 

या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल ५१२ कोटी रुपये खर्च करण्यात येतायत. या पुलाचे वयोमान १२० वर्षे आहे.