प्रवासादरम्यान विमानातून प्रवासी बेपत्ता

विमान प्रवासादरम्यान प्रवाशांचे सामान गायब होण्याची गोष्ट काही नवीन नाही. मात्र गुरुवारी गोव्याहून लखनऊ व्हाया कोलकाताच्या दिशेने  जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात चक्क प्रवासीच बेपत्त झाल्याची घटना समोर आली. 

Updated: Dec 18, 2015, 09:37 AM IST
प्रवासादरम्यान विमानातून प्रवासी बेपत्ता title=

नवी दिल्ली : विमान प्रवासादरम्यान प्रवाशांचे सामान गायब होण्याची गोष्ट काही नवीन नाही. मात्र गुरुवारी गोव्याहून लखनऊ व्हाया कोलकाताच्या दिशेने  जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात चक्क प्रवासीच बेपत्त झाल्याची घटना समोर आली. 

मुदित शर्मा असे या प्रवाशाचे नाव आहे. ते लखनऊ जाण्यासाठी आपली पत्नी यशी शर्मा आणि कुटुंबातील अन्य चार सदस्यांसह विमानातून प्रवास करत होते. यावेळी विमान कोलकाता येथे लँड झाले. त्यानंतर मुदित शर्मा गायब झाले. मुदित यांनी आपल्या पत्नीला बाथरुममध्ये जातो असे सांगितले मात्र त्यानंतर ते परतलेच नाही. 

जेव्हा कोलकाताहून विमान टेकऑफ करण्याच्या तयारीत होते तेव्हा पती बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुदित यांच्या पत्नीने जोरजोरात रडण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुदित शर्मा बेपत्ता झाल्याची बाब समोर आली. 

दरम्यान, मुदित यांच्यासोबत त्यांचा मोबाईल फोन आहे. मात्र त्यांनी कॉल उचलला नाही तसेच ते मेसेजनाही रिप्लाय देत नाहीयेत.