अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे प्रवास करणार भारताचे पंतप्रधान

पीएम नरेंद्र मोदी बोइंग ७७७ ने करणार परदेश यात्रा 

Updated: Jun 22, 2016, 08:47 PM IST
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे प्रवास करणार भारताचे पंतप्रधान title=

नवी दिल्ली : पंतप्रधान आणि राष्ट्रपती आतापर्यंत एअर इंडिया वनमधून प्रवास करायचे. पण आता पीएम नरेंद्र मोदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे अतिशय सुरक्षित अशा बोइंग ७७७ ने आता परदेश यात्रा करणार आहेत. २५ जूनला होणाऱ्या डिफेंस एक्‍यूजीशन काउंसिलच्या बैठकीमध्ये संरक्षणमंत्री  मनोहर पार्रिकर दोन बोइंग 777-300 एयरक्राफ्ट्स खरेदी करण्यासाठी मंजूरी देऊ शकतात.

या एअरक्राफ्टला नंतर एअरइंडिया वन नाव दिलं जाईल. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात येणार आहे. 

बोइंग ७७७ विमानाचं वैशिष्ट्य

१. बोइंग ७७७-३०० मध्ये कम्‍यूनिकेशनच्या सगळ्या डिवाईस उपलब्ध आहेत.

२. बोइंग ७७७-३०० ग्रेनेड आणि रॉकेट अटॅक झाल्यावरही सुरक्षित राहतं.

३. बोइंग ७७७-३०० मध्ये अँटी-मिसाइल डिफेंस सिस्‍टम इंस्टॉल आहे. डिफेंस सिस्टम मध्ये वॉर्निंग रिसीवर आणि मिसाईल अप्रोच वॉर्निंग सिस्‍टमही आहे.

४. बोइंग ७७७-३०० मध्ये कमीत कमी २ हजार लोकांसाठी जेवन स्टोर होऊ शकतं.

५. कोणत्याही आणीबाणीच्या वेळेत हवेतच इंधन भरण्याची सुविधा या विमानात आहे. यामध्ये २४ तास डॉक्‍टरांची सुविधा असते. या एअरक्राफ्टमध्ये इमरजेंसी सर्जरीसाठी ऑपरेशन रुम देखील आहे.

६. ब्रॉडबँड, रेडिओ आणि टेलीकॉम कनेक्‍शनची सुविधा या विमानात आहे.

७. विमानात १९ टीव्ही सेट्स आहेत. यामध्ये एका ऑफिस आणि एक बेडरूमही आहे.