पगारवाढीच्या दिवसांत भारतीयांसाठी एक खूशखबर...

भारतातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात यावर्षी जवळपास ११.३ टक्क्यांची वाढ होण्याची आशा व्यक्त केली जातेय. 

Updated: Jan 28, 2015, 04:01 PM IST
पगारवाढीच्या दिवसांत भारतीयांसाठी एक खूशखबर... title=

नवी दिल्ली : भारतातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात यावर्षी जवळपास ११.३ टक्क्यांची वाढ होण्याची आशा व्यक्त केली जातेय. 

एफएमसीजी तसंच रसायन उद्योग बाजाराचं प्रतिनिधित्व करेल, अशी शक्यता दिसतेय.  ग्लोबल मॅनेजमेंट कन्सल्टींग कंपनी 'हे ग्रुप'च्या अहवालात असा उल्लेख करण्यात आलाय. 

'हे ग्रुप इंडिया'चे भारतीय कारभाराचे मॅनेजर आमेर हलीम यांच्या म्हणण्यानुसार, 'आम्ही केलेल्या अभ्यासानुसार, २०१५ मध्ये वेतनवाढीचा दर दहाच्या अंकात राहील... सध्या तरी बाजाराकडून १० ते ११ टक्के पगारवाढीची अपेक्षा केली जाऊ शकते.'

हे ग्रुपच्या मते, ऑपरेशनल आणि क्लेरिकल कर्मचाऱ्यांच्या पगारात ११.९ टक्के तर मधल्या फळीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात ११.१ टक्के वाढ होऊ शकते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.